राज्याच्या मुख्य सचिवपदी यूपीएस मदान यांची नियुक्ती

0

मुंबई-राज्याच्या मुख्य सचिवपदी वित्त विभागाचे विद्यमान सचिव यूपीएस मदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांची लोकपाल सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याने मदान यांच्याकडे मुख्य सचिवपद सोपवण्यात आले आहे. मदान हे जैन यांच्याच बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून यूपीएस मदान आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची नावे सर्वात आघाडीवर होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र सेवाज्येष्ठतेनुसार मदान यांच्याकडे मुख्य सचिवपद आले आहे.