राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

0

मुंबई : राज्य सरकारने आज, गुरुवारी सहा वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे संचालक देबाशिष चक्रवर्ती यांची प्रधान सचिव आणि विकास आयुक्त म्हणून नियोजन विभागात बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात येवून त्यांच्या जागी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उस्मानबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांची बदली राज्य सामुहिक पूर्व परिक्षा विभागात आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुलाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर विक्रीकर सह आयुक्त अभय यावलकर यांची रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.