राज्यात वीज दर कमी होणार

0

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. महावितरणने वीज दर कमी करावेत, असे आदेश राज्य वीज नियामक आयोगाने दिले आहेत.

मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात केवळ महावितरणला वीजपुरवठा करण्याचा परवाना आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशामुळे घरगुती ग्राहक यांचे वीज दर ५ टक्के कमी होतील. औद्योगिक १० ते ११ टक्के, वाणिज्यिक ११ ते १२ टक्के, कृषीपंप १ टक्का याप्रमाणे कमी होणार आहेत. १ एप्रिलपासून या सुधारित दरांची अंमलबजावणी होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. ही दरकपात मुंबईतही लागू होणार आहे. पुढील ३ ते ५ वर्षांसाठी ही दरकपात लागू राहणार आहे.