Friday , February 22 2019

राज्यात शुक्रवार आणि शनिवारी थंडीची लाट

मुंबई : उत्तरेकडून वाहणारे वारे पुन्हा सक्रीय झाल्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी राज्यात थंडीची लाट राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९.९ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले.

गोव्यासह संपूर्ण राज्यात ८ ते १० फेब्रुवारीदरम्यान हवामान कोरडे राहील. ११ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा व विदर्भात हवामान कोरडे राहील. शुक्रवार आणि शनिवारी मुंबईचे कमाल व किमान तापमान २८ व १७ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज आहे. उत्तरेकडून वाहणारे वारे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. या वाऱ्याचा प्रभाव कोकणावर विशेषत: उत्तर कोकणावर अधिक आहे. परिणामी मुंबईच्या आणि उत्तर कोकणातील कमाल तापमानात घट झाली आहे, असे हवामान केंद्राचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

काश्मीर, हिमाचल उत्तराखंडात बर्फवृष्टी

श्रीनगर- जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद राहिल्याने आणि या भागात मोठी बर्फवृष्टी झाल्यानंतर विमान सेवा बंद राहिल्याने काश्मीरचा दुसºया दिवशीही उर्वरित देशाशी संपर्क तुटला आहे. उत्तराखंड व हिमाचल प्रदेशातही प्रचंड बर्फवृष्टी सुरू असून, तेथील रस्ते वाहतूकही बंद पडली आहे.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

बसस्थानकातून चार लाखांचे दागिने असलेली बॅग लांबवली

जळगाव | जळगाव येथील नवीन बसस्थानकातून बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या हातातून 411006 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!