राज्यात २३ नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांची संख्या ८९१वर

0

मुंबई – राज्यात आज पुन्हा २३ रुग्ण आढळल्याने राज्यातील करोना रुग्णांचा आकडा ८९१वर पोहोचला असून मुंबईतील करोना रुग्णांचा आकडा ५२६वर गेला आहे. आज आढळलेल्या २३ नव्या रुग्णांपैकी मुंबईत १०, पुण्यात ४, नगरमध्ये ३, नागपूर आणि बुलडाण्यात प्रत्येकी दोन व सांगलीत एक रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.
मुंबई- पुण्यासह राज्याच्या अनेक भागात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे हे लक्षात घेता राज्यातील करोनाबाधित शहरात लॉकडाऊनचा काळ वाढवला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडली. अर्थात केंद्र सरकारशी व मंत्रिमंडळातील चर्चेनंतर याबाबतचा निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.