राम मंदिराबाबत मोदींची मोठी घोषणा; मंदिराची जागा ट्रस्टकडे हस्तांतरित करणार !

0

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने राम मंदिराबाबतचा निकाल दिल्यानंतर आता मंदिर उभारणीसाठी ट्रस्टची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराबाबत एक मोठी घोषणा केली आहे. राम मंदिरासाठी ६७ एकर जमीन देण्यात येणार असून ती जमीन ट्रस्टकडे हस्तांतरीत करण्यात येईल अशी घोषणा मोदींनी केली आहे. वाराणसी येथे एका कार्यक्रमात बोलताना मोदींनी याची घोषणा केली.

अनेक वर्षांपासून वादग्रस्त जमीन म्हणून ओळखळी जाणारी अयोध्येतील राम जन्मभूमीची ६७ एकर जमीन केंद्र सरकारच्या ताब्यात होती. जोपर्यंत या जागेचा वाद मिटत नाही तोपर्यंत ही जमीन केंद्राच्या ताब्यात राहिल, असा आदेश याबाबत सुप्रीम कोर्टाने दिला होता. आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानेच रामजन्मभूमीचा वाद संपुष्टात आल्याने ही सर्व जमीन राम मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ला देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. “या संपूर्ण जागेवर आता भव्य राम मंदिराची स्थापना करण्यात येईल” असे मोदींनी म्हटले आहे.