रावेरला झन्ना-मन्ना खेळताना 53 हजार जप्त ; पाच जणांना अटक

0

रावेर- झन्ना-मन्ना पत्त्याचा डाव रंगात आला असताना रावेर पोलिसांनी धाड टाकत 53 हजारांचा ऐवज 25 रोजी जप्त करीत पाच जणांना अटक केली. नंतर आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली. धान्य मार्केटच्या मागील बाजूस भगवती नगर परीसरातील शेताच्या बांधार पोलिसांनी धाड टाकून रोख रक्कम 43 हजार 240 रुपये तसेच 10 हजार 500 रुपये किमतीचे चार मोबाईल व रवींद्र दिनकर पाटील, अनिल दत्तू चौधरी ,शेख नजीर शेखर रशीद, विकास यशवंत सैन्यास (सर्व राहणार रावेर) व मेहमूद खान उस्मान खान (रसलपूर) यांना अटक केली.