रावेरातील महाराष्ट्र एस.टी.कामगार सेनेच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे

0

बदली प्रकरणात आमदार चंद्रकांत पाटलांच्या हस्तक्षेपाचा आरोप

रावेर : आगारातील दोन कर्मचार्‍यांच्या वरीष्ठांकडे तक्रारी झाल्यानंतर त्यांची विभागीय नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी 5 फेब्रुवारी रोजी बदली केली होती मात्र बदलीचे आदेश काढल्यानंतरही आगार प्रमुखांनी आठवडा होत आला तरी या दोन्ही कर्मचार्‍यांना कार्यमुक्त न केल्याने त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी करीत संघटनेच्या हितासाठी वारंवार आंदोलने करून सभासद संख्या वाढविण्याचे काम येथील पदाधिकारी पार पाडत असतांना वरीष्ठ पातळीवरून संघटना सहकार्य करीत नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

आमदारांच्या हस्तेक्षेपाने अनेकांचे नाजीनामे
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील बदली प्रकरणात हस्तक्षेप करीत असल्याने संघटनेचे अध्यक्ष सतीश लोखंडे, उपाध्यक्ष शेख तौफिफ, प्रफुल्ल नेमाडे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंके, सचिव अमजद तडवी, सहसचिव किरण वाणी, युनूस तडवी, कोषाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण या आठ पदाधिकार्‍यांनी सोमवारी त्यांच्या पदाचे राजीनामे दिले आहेत. येथील आगारातील दोन कर्मचार्‍यांच्या झालेल्या बदली प्रकरणात आमदार चंद्रकांत पाटील हस्तक्षेप करीत असल्याच्या कारणावरून आगारातील महाराष्ट्र एस.टी.कामगार सेनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या पदाचे सामूहिक राजीनामे संघटनेच्या जळगाव विभागीय सचिवांकडे पाठविल्याने रावेर आगारातील कर्मचार्‍यात एकच खळबळ उडाली आहे. बदली झालेल्या या कर्मचार्‍यांची आगर व्यवस्थापक निलेश बेंडकुळे पाठराखण करीत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकार्‍यानी राजीनामा पत्रात केला आहे.