रावेर लोकसभा मतदारसंघात खासदारांच्या स्वखर्चाने गरजूंना जेवण

0

यावल : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने मतदारसंघात कुणीही उपाशी न राहण्यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रेरणेतून खासदार रक्षा खडसे यांनी गरजूंसाठी जेवणाची सोय केली आहे. यावल शहरातील विविध आदिवासी वस्तींवर, अत्यावश्यक सेवेत असलेले सर्व कर्मचारी व गोरगरीब, ग्रामीण रुग्णालयातील परीचारिका, बाहेरगावावरून आलेले रुग्ण यांना मोफत अन्न वाटप करण्यात येत आहे.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, शहराध्यक्ष निलेश गडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष रीतेश बारी, ओंकार राणे, भूषण फेगडे, स्नेहल फिरके, निर्मल चोपडे, किशोर महाजन, व्यंकटेश बारी, धीरज फेगडे, विजय महाजन, उज्वल कानडे, संजय फेगडे, भूषण नेमाडे, दिवाकर फेगडे, डिगंबर फेगडे, हेमंत फेगडे, केतन चोपडे आदींची उपस्थिती होती.