रावेर लोकसभेच्या पदाधिकारी निवडीसाठी भारीपातर्फे उद्या मुलाखती

0

भुसावळ- भारीपा महिला प्रदेश अध्यक्ष व जिल्हा पक्ष निरीक्षक यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा महिला आघाडी व सर्व मुख्य तालुका बॉडीसह सर्व तालुका आघाड्या नव्याने गठीत करण्यासाठी प्रत्यक्ष मुलाखती व जिल्हा आढावा बैठक रविवार, 3 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृहावर होत आहे. इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज व आपल्या कार्य अहवालासह मुलाखतीला हजर रहावे, असे आवाहन रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, महासचिव दिनेश इखारे, संजय सुरडकर, मोहन कोचुरे, अशोक बाविस्कर, अरुण नरवाडे आदी पदाधिकार्‍यांनी केले आहे. भारीपा बहुजन महासंघाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकुर, जळगाव जिल्हा निरीक्षक शरद वसतकर मुलाखती घेणार आहेत.