राष्ट्रपतींनी अभिभाषणात सीएएचा उल्लेख करताच विरोधकांचा गदारोळ !

0

नवी दिल्ली: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज शुक्रवार ३१ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. आज आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या कामांची माहिती दिली. या सरकारने सीएए कायदा आणून दुसऱ्या देशात अपमानित जीवन जगणाऱ्या हिंदुना भारतीय नागरिकत्व देणार आहे, तसेच देशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्यात येणार आहे. सीएएचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणात उल्लेख करताच सभागृहात विरोधी पक्षाने गदारोळ केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी केली.

सीएए, एनआरसी कायद्याला कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षाने विरोध दर्शविला आहे. विधेयक मंजूर झाल्यापासून विरोधक आंदोलन करत आहे.