राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावाकडून लॉकडाऊनचे उल्लंघन: पुणे-मुंबई प्रवास

0

पुणे: लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर फिरण्यास परवानगी नाही. मात्र राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांचे बंधू नितीन भोसले यांनी परिवारासह लॉकडाऊनच्या काळात पुणे-मुंबई असा प्रवास केला आहे. बँक घोटाळ्यातील आरोपी वाधवान कुटुंबाना महाबळेश्वरला जाण्यास पोलिसांनी परवानगी दिल्याने राष्ट्रवादीकडे असलेल्या गृह खात्यावर टीका होत आहे, त्यातच हा प्रकार पुढे आल्याने राष्ट्रवादीवर अधिक टीका होत आहे. नितीन भोसले यांनी प्रवासासाठी प्रांताधिकाऱ्यांकडून पत्र मिळवले होते. हे पत्र दाखवूनच त्यांनी हा सगळा प्रवास केला. पण प्रांताधिकाऱ्यांनी पत्र दिल्याचा दावा फेटाळला आहे, त्यामुळे अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नितीन भोसले यांनी ८ एप्रिल रोजी पुणे-मुंबई असा प्रवास केला होता. आपल्या नातेवाईकाला घेऊन त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर ते मुंबईमधील वांद्रे पूर्व इथपर्यंत हा प्रवास केला.

राष्ट्रवादी काँग्रसचे विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले सध्या येरवडा जेलमध्ये आहेत. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत ७१ कोटी ७८ लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.