Tuesday , March 19 2019

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाचा शहरात निषेध

जळगाव : राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयका विरोधात आयएमए जळगाव शाखेतर्फे 28 जुलै रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तपासणी बंद ठेऊन शांततेत धिक्कार दिन पाळण्यात आला. सकाळी 9 वाजता सर्व डॉक्टर्स आयएमए हॉल येथे एकत्रीत जमले. निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे या लोकशाही विरोधी विधेयकाचा (एनएमसी) शांततेत धिक्कार दिन पाळून निषेध करण्यात आला. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या.

यांची होती उपस्थिती

यावेळी लेह लडाख येथे पर्यटनास गेले असतांना अपघातग्रस्त रूग्णांचा जीव वाचविणार्‍या डॉ.धिरज चौधरी, डॉ.नितीन खडसे, डॉ.दीपक पाटील, डॉ.विरेंद्र झांबरे, डॉ.निलेश चौधरी व जम्मु काश्मिर येथे सामाजिक कार्य करणारे डॉ.धर्मेंद्र पाटील (जळगांव) यांचा अध्यक्ष डॉ.किरण मुठे, उपाध्यक्ष डॉ.प्रदीप जोशी, मानद सचिव डॉ.विलास भोळेे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

बिबट्याची मादी जेरबंद

ओतूर : जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथे बिबट्याची मादी पिंजर्‍यात जेरबंद झाली. रविवारी वडगाव कांदळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!