रा.कॉं.महिला जिल्हाध्यक्षपदी वंदना चौधरी

जळगाव: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव जिल्हा ग्रामीणच्या महिला जिल्हाध्यक्षपदी वंदना अशोक चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र आज शनिवारी १३ रोजी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.