आयुक्तांची चौकशी करा: नगरसेवक तुषार कामठे

0

पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने काढलेल्या विकास कामांच्या निविदांमध्ये ’रिंग’ जात आहेत. पुरावे देऊन आयुक्त ’रिंग’ झाली नसल्याचा दावा करतात. ’रिंग’ मध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप करत त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार क ामठे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांनी ही मागणी केली आहे. नगरसेवक कामठे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून निविदांमध्ये ठेकेदारांनी संगनमत (रिंग) केल्या आहेत. रिंगमध्ये महापालिका अधिकारी सहभागी आहेत. त्यांच्या सहकार्यानेच ’रिंग’ चालू आहेत. यामुळे करदात्या नागरिकांचे नुकसान होत आहे. ठेकेदार आणि रिंगमधील अधिका-यांना मोठा लाभ होत असल्याचे सांगितले आहे.

निविदा काढताना भांडार विभाग आणि स्थापत्य विभाग अनेक जाचक नियम व अटी निविदेमध्ये टाकतात. त्यामुळे सर्वसामान्य ठेकेदारांना निविदा भरणे अशक्य होते. नेहमीचे रिंग करणारे 5 ते 6 ठेकेदार या अटींमध्ये बसतात. त्यामुळे अपोआपच रिंग होते. याबाबत अनेकदा आयुक्तांना पुराव्यासह निवेदने देऊन रिंगमध्ये सहभागी अधिक ा-यांवर, ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली. पाच वेळा पुराव्यासह निवेदन देऊन कारवाईची मागणी केली नगरसेवक कामठे यांनी केली आहे.