रिक्षाचालकाला दमबाजी करणार्‍या मद्यधुंद तरुणीची पोलिसांनी उतरविली ‘झिंग’

0

1200 रुपये वसुल करत रिक्षाचालकाला पाजले वाहतूक नियमांचे डोस

जळगाव – मद्यधुंद अवस्थेतील तरुणाचा धिंगाणा आपण अनेकदा अनुभवला असेल. मात्र मुलगी व तेही मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा…मनाला पटत नाही ना… मात्र हे खर आहे. रिक्षात बसल्यावर मद्युधंद तरुणीने रिक्षाचालकाला वाहतूक नियमांचे डोस पाजले. व आपण पोलीस असल्याचे सांगत त्याच्याकडून 1200 रुपये वसूल केल्याचाही धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी 1 वाजता अजिंठा चौकात घडला. रिक्षाचालकाला संशय आल्याने वाद पोलीस ठाण्यात पोहचला. खरे खुरे पोलीस अनुभवल्यावर तरुणीची नशा उतरली. तीने रिक्षाचालकाला 1200 रुपये परत केले अन् वादावर पदडा पडला. अंगात शर्ट, गॉगल अन् जिन्सपॅन्ट अशा एखाद्या श्रीमंत तरुणाप्रमाणे वेशभूषा परिधान केलेल्या मद्यधुंद तरुणीला पाहिल्यावर पोलीसही अवाक् झाले.

अंगात वर्दी नाही…नाही तर दाखवल असतं
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर शहरातील 29 वर्षीय तरुणी मंगळवारी जळगावात आली. याठिकाणी कोंबडी बाजार परिसरात एका परमीटरुम बीयरबारवर तरुणी बियर पिली. बियर पिल्यानंतर, एमआयडीसीकडे जाण्यासाठी तरुणी रिक्षात बसली. या रिक्षात आधीच दोन स्कार्फ बांधलेल्या मुली बसलेल्या होत्या. रिक्षाचालकाच्या कानात एअरफोन दिसले अन् मद्यधुंद तरुणी चांगलीच भडकली. रिक्षा चालवितांना फोन बोलू नये, अंगात गणवेश नाही, असे म्हणत तरुणीने रिक्षाचालकाला वाहतुकीचे नियमांचे डोस पाजायला सुरुवात केली. यादरम्यान तरुणी अंगात वर्दी नाही, नाही तर दाखवल असत असही तरुणी यावेळी म्हटली. तरुणी पोलीस असावी म्हणून रिक्षाचालकाची ततफफ झाली. तरुणीने गणवेश नाही, वाहन चालवितांना फोनवर बोलणे असे म्हणत रिक्षाचालकांला पाच हजारांचा दंड सांगितला. घाबरलेल्या रिक्षाचालकाने चटकन खिशातील 1200 रुपये काढून दिले.

नशेतील तरुणीला विद्यार्थीनीही घाबरल्या
मद्यधुंद तरुणीने पैसे मागे बसलेल्या विद्यार्थीनीकडे दिले. विद्यार्थीनी रिक्षाचालका पैस परत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा मद्यधुंद तरुणीला संशय आल्याने तीने विद्यार्थीनीलाही सुनावले. तुमचे लफडे आहे का अस म्हणून स्कार्फ का बांधला आहे, असे म्हणत विद्यार्थीनींवर मद्यधुदं तरुणी रागावली. यानंतर रिक्षाचालकाला मद्यधुंद तरुणीवर संशय आला. ती पोलीस नसल्याचे खात्री झाल्यावर त्याने तिच्यासोबत वाद घातला. वाद एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहचला. याठिकाणी मद्यधुंद तरुणीने मी असा काहीच प्रकार केला नसल्याचे सांगत रिक्षाचालकासह विद्यार्थीनींना खोटे ठरविले. खरे पुरे पोलीस अन् खाकीचा हिसका पाहिल्यावर तरुणीने रिक्षाचालकाकडून घेतलेले पैसे परत केले.

टेन्शनमध्ये एक बियर पिली…
खरोखरच खाकीचा हिसका काय असतो तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करावा लागेल असे शब्द कानी पडल्यावर मद्यधुंद अवस्थेत तरुणीची दारुची नशा उतरली. यानंतर येथील कर्मचार्‍यांनी महिलांनी दारु पिणे आपल्या संस्कृतीला शोभत नाही, यापुढे असे करु नका, किमान पोलीस असल्याच तरी सांगू नका अशी समजूत काढली. तरुणीने चूक कबूल करत मला दोन मुले आहेत, मी टेन्शनमध्ये असल्याने एक बियर पिली असे सांगत मला माफ करा, मला सोडून द्या, अशी गयावया करायला लागली. रिक्षाचालकाची तक्रार नसल्याने नोंद घेवून तिला सोडून देण्यात आले. याप्रकाराची एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकच चर्चा होती.