रिक्षा चालकावर चॉपरने हल्ला; चौघांवर गुन्हा

0

जळगाव – रिक्षाने घरी जाणार्‍या रिक्षाचालकास चौघांनी मारहाण करून चॉपरने वार करून गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिपक गंगाराम सोनवणे (कोळी) वय-40 रा. वाल्मिक नगर, बीचा जवळ हे रिक्षाचालक असून वासुदेव रामकृष्ण सोनवणे आिाण भिमराव भास्कर कोळी दोन्ही रा. कांचन नगर या दोन मित्रांसोबत रात्री 12 वाजेच्या सुमारास जेवणासाठी रिक्षाने शेतात गेले होते. जेवन करून स्वयंपाकाचे भांडे रिक्षात टाकून घरी येत असतांना रात्री 1 वाजेच्या सुमारास कांचननगरातील उज्ज्वल चौकात संशयित आरोपी आकाश मुरलीधर सपकाळे आणि गणेश दंगल कोळी आणि अन्य दोन जण (पुर्ण नाव गाव माहित नाही) सर्व रा. कांचन नगर हे उभे होते.

चौकातून रिक्षा जात असतांना चालत्या रिक्षात बसलेले वासुदेव सोनवणे यांच्या कानशिलात आकाश सपकाळे याने मारले. याचा जाब रिक्षाचालक दिपक सोनवणे याने विचारल्याने राग येवून संशयित आरोपी गणेश कोळी आणि इतर दोन जणांनी पडकले तर आकाश सपकाळे याने चॉपर काढून दिपकच्या मांडीवर चार वार केले. दिपकवर वार केल्यानंतर चौघेजण घटनास्थळाहून फरार झाले. दरम्यान, जखमीवस्थेत दिपकला वासुदेव सोनवणे आणि भिमराव कोळी यांनी उपचारासाठी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले. चाकूहल्ला केल्याची घटना घडल्यानंतर शनीपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दिपक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलिसात चार जणांविरोधात प्राणघातक हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.