रेल्वेच्या विशेष अभियानात दोन कोटी 98 लाखांचे उत्पन्न प्राप्त

0

भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनात दीपावली व छट पूजा दरम्यान विशेष तिकीट चेकींग अभियान 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात आले. या माध्यमातून 48 हजार 671 केसेसद्वारे रेल्वेला तब्बल दोन कोटी 98 लाखांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पन्न 26.16 टक्के जास्त आहे. या अभियानात मुख्य तिकीट निरीक्षकांसह विविध स्कॉडचे कर्मचारी सहभागी झाले.