रेल्वे इंजिन ओव्हरालिंगसाठी खाजगी ठेका : रेल्वे प्रशासनाचा सीआरएमएस संघटनेने निषेध

0 1

भुसावळातील पीओएचमध्ये द्वारसभा : मंडळ अध्यक्ष व्ही.के.समाधीया यांची रेल्वे धोरणावर टिका

भुसावळ- रेल्वे प्रशासनातर्फे विविध विभागात ठेकेदारी पद्धतीने कामे दिली जात आहेत. रेल्वे विद्युत इंजिन कारखान्यातही (पीओएच) 45 इंजिनाच्या बोगीचे ओव्हरऑलिंग करण्याचे काम यंदापासून खासगी ठेकेदाराला दिले जाणार असल्याने या निर्णयाचा शुक्रवारी सीआरएमएसतर्फे निषेध करण्यात आला. पीओएचच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कर्मचार्‍यांची द्वारसभा घेऊन या निर्णयाला विरोध करण्यात आला. मंडळ अध्यक्ष व्ही.के.समाधीया यांनी रेल्वेच्या धोरणावर टीका केली. मंडळ सचिव एस.बी.पाटील, डी.यू.इंगळे, संजय दुबे, मेघराज तल्लारे, डी.व्ही.आव्हाड यांनीही मनोगत व्यक्त केले. रेल्वे प्रशासनाविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली. सीआरएमएसतर्फे पीओएच प्रशासनाला मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. शांताराम जाधव, रविंद्र सोनवणे, सिद्धार्थ साळुंखे, मिलींद पाटील, किशोर कोलते, अभय आखाडे, ईश्वर बाविस्कर, हरिचंद्र सरोदे आदी उपस्थित होते.

आंदोलन छेडण्याचा इशारा
झोनल सचिव पी.एस. नारखेडे यांनीही मार्गदर्शन केले. वर्कशॉपमधील कामे ठेकेदारी पध्दतीने दिल्यामुळे संपूर्ण वर्कशॉपचे काम बंद होईल. त्यामुळे या निर्णयाविरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.