रेल कामगार सेनेच्या शिबिरात 300 कर्मचार्‍यांची तपासणी

0

भुसावळ- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रेल कामगार सेनेतर्फे आयोजित मोफत तपासणी शिबिरात 300 कर्मचार्‍यांनी आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचे डीआरएम आर.के.यादव यांनी कौतुक केले. प्रसंगी पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यांची होती प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून एडीआरएम मनोज सिन्हा, सीएमएस पी.के.सामंतराय, वरिष्ठ डीपीओ एन.डी.गांगुर्डे, वरीष्ठ डीएमओ स्वप्नील नीला, सिनिअर सीडीएम आर.के.शर्मा, सिनिअर डीएमएन आर.आर.पाटील, एम.एस.तोमर, स्थानक संचालक जी.आर.अय्यर, संदीप सक्सेना या अधिकारी वर्गाची उपस्थिती होती. रेल कामगार सेनेचे राजेश लखोटे यांनी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले. ललितकुमार मुथा, प्रदीप भुसारे, विनोद वाघे, प्रीतम टाक, रामदास आवटे, योगेश माळी, मंगू शेलोडे, कमलाकर बाणाईत, विरकुमार मम्मैया, सुरेंद्र यादव, प्रकाश कसाळे, विजय तायडे, अ. अजीज, नरेश शर्मा, तम्मा पहिलवान, एम.के.शहा, सूरज सागर आदी उपस्थित होते.