रेशन दुकानदारांकडून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन: युवासेनेचे तक्रार

0


जळगाव। सध्या कोरोना प्रादूर्भावामुळे झालेल्या स्थितीत नागरिकांचे रोजगार थांबलेले आहेत. अशात जे लाभार्थी कुटुंब आहेत अशांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळायला हवे होते ते मिळत नाही. परंतु लाॅकडाऊन व जमावबंदीच्या आदेशाचे सर्व तंतोतंत पालन करत असून त्यामुळे मुजोर दुकानदारांची लेखी तक्रार युवा सेनेने जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे व्हाट्सअॅपद्वारे केली आहे.
जळगाव शहरातील असो वा जिल्हातील स्वस्त धान्य रेशन दुकानदार हे मुजोरपणा करत आहेत. दुकानासमोर लोकांना लांबच लांब रांगा लावून सोशल डिंस्टस न ठेवता ताटकाळत ठेवून नंतर थंब येत नाही, असे सांगून फिरवत आहेत. रेशन मिळण्याची थंब प्रोसेस मागील एक ते दीड वर्षापासून सुरू आहे. तरी देखील अद्याप ती पुर्ण झालेली नाही. चार-चारवेळा कागदपत्रे देऊन देखील कुटुंबाची नावे व त्यांचा आर.सी. नंबर का येत नाही? त्याला कारणीभूत कोण? गेल्या एक ते दीड वर्षापासून वारंवार दुकानदार लोकांना तहसील कार्यालयात जा व तहसील कार्यालयात गेल्यावर तिथं तुम्ही तुमच्या दुकानदारांनाच कागदपत्रे द्या, अशा पद्धतीने दिशाभूल केली जात आहे. तहसीलदार वैशाली हिंगे यांना याबाबत विचारले असता ते असमाधानकारक व अनपेक्षित उत्तर देत आहेत. या लाॅकडाऊनच्या स्थितीमध्ये कित्येक कुटुंब रेशन मिळण्यापासून वंचित आहे. अशात थंब प्रोसेसने धान्य न देता नोंद करून रेशनकार्ड पाहून धान्य वितरित करावे, मुजोर आणि सहकार्य न करणाऱ्या रेशन दुकानदारावर व सर्व समजून देखील या तक्रारींवर हरकत न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कडक कारवाई करावी, अशी मागणी
युवासेना जळगाव जिल्हाचे सरचिटणीस राहुल पोतदार यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे.