रोझोदा ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कामगाराचा रावेरात मृत्यू

0

रावेर- तालुक्यातील रोझोदा ग्रामपंचायतीत स्वच्छता कामगार असलेल्या बंटी हरू गोयर (28, रा.फैजपूर) या तरुणाचा शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास रावेर शहरातील लक्ष्मी टॉकीजजवळ मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. याबाबत रावेर पोलिसात पोलिस पाटील लक्ष्मीकांत प्रकाश लोहार यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक ओमप्रकाश सोनी करीत आहेत. दरम्यान, उपासमारीमुळे गोयर यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे.