रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षपदी नितीन ढमाले

0

सचिवपदी विजय नाईक यांची झाली निवड

चिंचवड- रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षपदी उद्योजक नितीन ढमाले यांची निवड करण्यात आली. तर, सचिवपदी विजय नाईक, खजिनदारपदी परिमल दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिंचवड येथील रोटरी सेंटरमध्ये रविवारी (दि.15) हा पदग्रहणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. डॉ. शैलेश पालेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मावळते अध्यक्ष बिमल रावत यांच्याकडून नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन ढमाले यांनी अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. रोटरी क्लब ऑफ पिंपरी हा शहरातील सर्वात जुना क्लब असून 42 वे अध्यक्ष म्हणून नितीन ढमाले हे काम करतील. या क्लबच्या माध्यमातून गेली 42 वर्षे सातत्याने समाज उपयोगी कार्य सुरू आहे. हॅपी व्हिलेज, पाठशाळा, सायक्लोथान, टॉयलेट प्रकल्प अशा प्रकल्पाअंतर्गत अनेक समाज कार्य सुरू आहेत.

शेवटच्या घटकासाठी काम करणार
नितीन ढमाले म्हणाले, रोटरीच्या चतुसूत्रीनुसार आपण समाजाच्या शेवटच्या घटकासाठी म्हणजेच वंचित, दीन दुबळ्या, दुर्लक्षित लोकांसाठी वेळ आणि पैसे देऊन काम करायचे आहे. ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षण, आरोग्य सुविधा, कर्करोग जागृती, सरपंचांना प्रशिक्षित करणे, अवयव दान मोहीम हे प्रकल्प प्रमुख्याने राबविण्यात येणार आहेत.