रोटरी पिंपरी टाऊनतर्फे आदिवासींना रेनकोट

0 1

पिंपरी : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील बोरगाव येथील आदिवासी पाड्यावरील शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाण्या-येण्यासाठी 100 रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच 700 वह्यांसह इतर शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. रेनकोट आणि वह्या मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेह-यावरील आनंद ओसांडून वाहत होता. या शाळेत आदिवासी पाड्यावरील मुले शिक्षण घेतात. रोटरी क्लबतर्फे बुधवारी शाळेत जाऊन वाटप करण्यात आले. यावेळी पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे, सचिव महादेव शेंडकर, प्रकल्प अधिकारी संतोष भालेकर, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वाडकर, सचिव सुभाष गारगोटे, शाळेचे मुख्याध्यापक बी.एस शिशुपाल, विक्रम घुले, किशोर गोरे आदी उपस्थित होते.