रोहित पवारांनी केले मोदींच्या हेतूचे कौतुक

0

मुंबई: करोना विरुद्धच्या लढाईत सामूहिक शक्तीचं दर्शन घडवण्यासाठी दिवे व मेणबत्ती जाळण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार व शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी स्वागत केले आहे. ‘देशाला करोनाविरोधात एकत्र आणण्याचा मोदींचा हेतू असावा,’ असे रोहित यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता दिवे, मेणबत्ती किंवा मोबाईलची फ्लॅशलाईल लावण्याचे आवाहन केल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मिम्स व्हायरल होत आहे. विरोधीपक्षानेही त्यावर टीका केली आहे. तर हे काही रॉकेट सायन्स नसून कोरोना विरुध्द लढण्यासाठी १३० भारतियांना एकत्र आणण्याचा हा मोदींचा प्रयत्न असल्याचेही बोलेले जात आहे. अशात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र मोदींच्या आवाहनाचे स्वागत केले आहे. ‘दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधानांचा हेतू असावा. तसे असेल तर त्याचं स्वागतच करायला हवे. अशाच प्रकारे प्रत्येकानं स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करावा, असे आवाहनही पवार यांनी केले. विशेष म्हणजे जनता कफ्यूच्या वेळी मोदींनी टाळ्या व ताट वाजविण्याचे आवाहन केले होते. याचे स्वागत करताना खुद्द शरद पवार यांचाही व्हिडीओ समोर आला होता. आताही संकटसमयी रोहित पवार यांनी राजकारण न करता पंतप्रधानानांच्या भूमिकेचे स्वागत केल्याने सोशल मीडियावर त्यांच्या भूमिकेचे कौतूक होत आहे.