लग्नसराईतील गडबड दाखविणाऱ्या ‘वेडिंगचा शिनेमा’चा ट्रेलर रिलीज

0 2

मुंबई – लग्नसराई म्हटली की लगबग, गोंधळ, खरेदी, मानपान या सर्व गोष्टी आल्याच. लग्न समारंभासाठी करावी लागणारी तयारी आणि त्यातून होणारा गोंधळ ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी हे ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. या चित्रपटाचा टीजर आणि पहिले गाणे रिलीज झाल्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता होती. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही लग्नाची लगबग पाहायला मिळते. या चित्रपटात मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे, असे स्टारकास्ट झळकणार आहे. डॉ. सलील कुलकर्णी यांनीच या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह कथा, पटकथा, संवाद आणि संगीताची धुरा सांभाळली आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांची निर्मिती असलेला ‘वेडिंगचा शिनेमा’ १२ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.