ललित कोल्हेंचा विजय; प्रभाग 11 मध्येही भाजपची बाजी

0

जळगाव- प्रभाग 11 मध्ये चारही जागांवर भाजपने विजय मिळविला आहे. या प्रभागात अ मध्ये पार्वताबाई भील, ब मधून उषा पाटील, क मधून सिंधू कोल्हे तर ड मधून माजी महापौर ललित कोल्हें यांचा विजय झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच महापौर ललित कोल्हे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या प्रभागात शिवसेनेतर्फे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे लहान बंधू शामकांत सोनवणे व बुधा हटकर (पाटील) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.