लाच देण्यासाठी कुणाल कामरा थेट राज ठाकरेंच्या घरी

0

मुंबई: पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानात त्रस्त केल्याबद्दल कुणाल कामरा याला चार विमान कंपन्यांनी सहा महिने प्रवास बंदी घातली आहे. आता कुणाल कामरा यांनी राजत ठाकरे यांना आपल्या ‘शट अप कुणाल’ या कार्यक्रमात बोलवण्यासाठी चक्क राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन ठाकरे यांना लाच देवू केली आहे. लाच म्हणून राज यांच्या आवडीचे मुंबईतील किर्ती कॉलेजजवळील ‘किर्तीचे वडे; घेऊन गेला. यासंदर्भात कुणाल कामराने स्वतः ट्विट करून सांगितले आहे.

कुणाल कामराने राज ठाकरे यांना एक पत्र सुद्धा लिहिले आहे. ते ट्विट केले असून यामध्ये राज ठाकरे यांनी वेळ द्यावा, अशी विनंती केली आहे. या पत्रात “मी रिसर्च केले आणि यात तुम्ही मुंबईतील किर्ती वड्याचे मोठे चाहते असल्याचे समजले म्हणून मी तुम्हाला तुमचा आवडता खाद्यपदार्थ ‘लाच’ म्हणून देतो आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ द्याल.” असे कुणाल कामराने म्हटले आहे.

याचबरोबर, कुणाल कामराने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. “राज ठाकरे सर आता तरी मला वेळ द्या. सर्व लोकांना वाटते की, मला माझ्या शोमध्ये पाहुण्यांना आणण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नाही. हे बघा पाहुण्यांना आणण्यासाठी मी किती प्रयत्न करत असतो. तुमच्यापर्यंत अधिक चांगली माहिती पोहोचविण्यासाठी मी यापेक्षाही अधिक प्रयत्न करणार आहे.”