लेवा पाटीदार समाजातील 40 आदर्श ‘सासू सूनां’ चा सन्मान

0

बहिणाई ब्रिगेड लेवा पाटीदार ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम

विविध क्षेत्रातील 13 महिला, 6 भजनी मंडळ, 18 बचत गट, 34 मुख्याध्यापिका, 75 शेतकरी व महिला शेतमजुर आदिंचा सत्कार

जळगाव-  अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाई ब्रिगेड लेवा पाटीदार ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेवा पाटीदार समाजातिल आदर्श सून सासू सन्मान सोहळ्यात 40 आदर्श सासू सुनासह विविध क्षेत्रातील 13 कतृर्त्ववान महिला, 6 भजनी मंडळ, 18 बचत गट, 34 मुख्याध्यापिका, 75 शेतकरी व महिला शेतमजुर आदिंचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील कतृर्त्ववान महिला व कष्टकरी शेतकरी महिला सन्मान सोहळा रविवार 10 मार्च रोजी लेवा बोर्डींग सरस्वती हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश पाटील होते. तर, प्रमुख अतिथी आमदार राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे, पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, माजी महापौर आशाताई कोल्हे, सिंधूताई कोल्हे, अ‍ॅड. प्रकाश पाटील, अ‍ॅड. संजय राणे, प्रदेशाध्यक्ष प्रदिप भोळे, मधुकर भंगाळे, मधुकर चौधरी, वामनदादा खडके, ए.बी.पाटील, ललितभैय्या चौधरी, अश्विनी पाटील, सावित्री बेंडाळे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांनी एकत्र कुटुंबपद्धती समाजामध्ये असल्यास कुटुंब संस्कारक्षम होतील, असे मत व्यक्त केले. दरम्यान अपंग शेतकरी चंद्रकांत चौधरी यांच्या धैर्याचे कौतुकही त्यांनी केले. त्यानंतर भालचंद्र पाटील यांनी मनोगतात महिलांना आवाहन करतांना सांगितले की, बाहेरील क्षेत्राबरोबरच कुटुंबाकडे व्यवस्थीत लक्ष दिल्यास संस्कारक्षम पिढी तयार होईल. अध्यक्षीय भाषणात कुटुंबनायक रमेशदादा पाटील यांनी प्रत्येक सूनने सासूचा सांभाळ केला तर भविष्यात वृद्धाश्रमांची संख्या कमी होईल, असे स्पष्ट केले.

प्रास्ताविक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन भावना चौधरी व अनिता पाटील यांनी केले. आभार प्रदिप भोळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी बहिणाई ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुनीता नारखेडे, महानगराध्यक्ष हर्षा बोरोले, सविता येवले, योगिनी बेंडाळे, महानगराध्यक्ष निखील रडे, शुभम चिरमाडे, भावेश पाचपांडे, अतुल चौधरी, परेश नेहते, शंतनु नारखेडे, मयूर नेमाडे, शुभम पाटील, शेतकरी जिल्हा संघटनेचे राजेंद्र चौधरी आदिंनी कामकाज पाहिले.

यांचा विशेष सन्मान
याप्रसंगी स्वर्गिय दिलीपराव पंडित कोल्हे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच कोल्हापूरचे आयजी डॉ. सुहास वारके यांना लेवारत्न पुरस्कार तर, अश्विनी पाटील यांना कलाक्षेत्रात लेवा युवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.