लोकनियुक्त सरपंच रद्द केल्यास सरकारला जागा दाखवू; सरपंच परिषदेचा इशारा !

0

शेवगाव : नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याची पद्धत रद्द केल्यानंतर आता सरपंच थेट जनतेतून निवडण्याची पद्धत देखील रद्द करण्याची हालचाली सरकारने सुरु केली आहे. काही ग्रामपंचायतीकडून या निर्णयाचे स्वागत होत असले तरी काहींनी याला विरोध केला आहे. ‘सरपंच जनतेतूनच निवडला जावा’ अशी मागणी महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेने केली आहे.

सरकार ने हा निर्णय रद्द करू नये यासाठी सरपंच परिषदेने आंदोलन सुरू केले आहे. आज शेवगाव येथे आज परिषदेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

आम्ही राजकारण करत नाही; पण सरकारला नवे नेतृत्व तयार होऊ द्यायचे नाही काय? सरकार जर आमच्यासोबत जाणीवपूर्वक हीनतेने वागत असेल तर सरकारला आपापल्या गावात योग्य जागा दाखवून देऊ. आम्ही पुन्हा सरकार मधील लोकांना भेटणार असून विनंती करणार आहोत. मात्र, तरीही सरकार निर्णयावर ठाम राहिले तर प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात मोर्चे काढू, असा इशारा सरपंच परिषदचे राज्य अध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिला आहे.