लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौघांवर हद्दपारीची कारवाई

0 1

प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांचे आदेश ; तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई

फैजपूर- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार जणांवर हद्दपारीची तर तिघांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश फैजपूर उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी नुकतेच आदेश काढल्याने खळबळ उडाली आहे. कारवाईबाबत प्रस्ताव फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांच्याकडे दिला होता. शेख युनूस शेख युसूफ याला नऊ महिने, अहिरवाडी येथील सुधाकर पंडित लहासे व रवींद्र गौतम कासोदे यास सहा महिने तसेच यावल येथील देवानंद बाळू कोळी यास सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. तर कलम 107 प्रमाणे खिर्डी, ता.रावेर येथील विनोद रवींद्र सुतार, भुसावळ येथील गोपाल द्वारकादास अग्रवाल, पाडळसे, ता.यावल येथील शालिक सोमा भोई यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.