लोकसभा निवडणूकीसाठी भरारी पथकांच्या नियुक्त्या

0 1

पथक प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिकार्‍यांचे अधिकार

जळगाव, दि. २७ – लोकसभा निवडणूकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी विधानसभा मतदारसंघ निहाय स्थायी निगरानी पथक व फिरते पथकांची नियुक्ती केली आहे. निवडणूक कालावधीत पथक प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
जिल्हादंडिाधिकारी डॉ. ढाकणे यांनी जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघासाठी राजेंद्र वाघ, चोपडा विधानसभा मतदार संघासाठी शुभांगी भारदे, उजामनेर विधानसभा मतदार संघासाठी प्रसाद मते, मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघासाठी सुनिल सुर्यवंशी, यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषित केले आहे.

स्थायी निगरानी पथक
विधानसभा मतदार संघनिहाय स्थायी निगरानी पथकाची नियुक्ती केली आहे. त्यात -चोपडा विधानसभा मतदार संघासाठी सुभाष वरडे, दिलीप सोनवणे, भाऊसाहेब देशमुख, रावेरसाठी नवाज तडवी, प्रसादकुमार काटे, रत्नाकर चौधरी, भुसावळसाठी एम आर. दुसाने, एम. पी. सपकाळे, एम. बी सपकाळे, समाधान पाटील, बाळकृष्ण खैरनार, अंबादास पाटील, जळगांव ग्रामिणसाठी जी.बी. बिर्‍हाडे, शिवाजी नलभे, शैलेष हिवाळे, अमळनेर साठी आर.पी. साळुंखे, एन. जी. पाटील, एस.आर. बोरसे, एरंडोलसाठी एम. के. नंदनवार, एस. पी. पवार, एस.एस. पाटील, चाळीसगांवसाठी अरविंद येवले, शिवदास चव्हाण, एस. व्ही. सुर्यवंशी, पाचोरासाठी राजेंद्र धस, निरंतर अधिकारी, विष्णूकुमार राठोड, किशोर महाले, जामनेरसाठी डी. एम. कोळी, एस. आर. कुंभार, एन. ए. शेख, मुक्ताईनगरसाठी दिपक ओतारी, एस. भावसार, एम. एस. पाटील, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

फिरते पथक
जिल्ह्यात फिरते पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. चोपडासाठी सतीष कोळी, जितेंद्र पाटील, दिलीप पाटील, रावेरसाठी ज्ञानदेव निले, मनोहर पाटील, शैलेष तरसोदे,भुसावळसाठी डी. एस. चव्हाण, डी. पी. सपकाळे, योगीता पाटील, जळगांव शहरसाठी रमेश पाटील, सुभाष पाटील, सचिन ऐतलवाड, जळगांव ग्रामीणसाठी गुलाबराव पाटील, मुक्तार तडवी, दिनेश उगले, अमळनेरसाठी डी. एम. वाडीले, के. एम. जोशी, आर. आर. ढोले, एरंडोलसाठी एम. एम. सोनार, एन. झेड. वंजारी, विजय येवले, चाळीसगांवसाठी रालेभट महादेव, डिगंबर शिरके, सुकदेव जाधव, पाचोरासाठी रामचंद्र सैंदाणे, मेघश्याम चौधरी, महेंद्र पाटील,जामनेरसाठी डी. एस. लोखंडे, आर. एन. चव्हाण, व्ही. व्ही. बैसाणे, मुक्ताईनगरसाठी आर. ए. तडवी, पी. एन. महाजन, संजय इंगळे यांची नियक्ती करण्यात आली आहे.