लोकोपयोगी योजना बंद करणेच महाविकास आघाडीचा अजेंडा: चंद्रकांत पाटील

0

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या योजनांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारवर स्थगिती सरकार म्हणून आरोप देखील होऊ लागले आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकोपयोगी योजना बंद करणे हेच महाविकास आघाडीच्या सरकारचा अजेंडा असल्याचे आरोप केले आहे. सरकार काही योजना अमलात आणते याचा अर्थ ती लोकोपयोगी असते मात्र हेतुपुरस्सर केवळ राजकारण म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारडून युती सरकारच्या काळातील योजना बंद केल्या जात आहे असे आरोप चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मराठवाड्यातील जनतेचा अतिशय जिव्हाळ्याची असणारी पाणी योजना बंद करून सरकार मराठवाड्यावर अन्याय करत आहे असे आरोप त्यांनी केले.