लोणवाडीत विजेच्या धक्याने दोन म्हशींचा मृत्यू

0 1

जामठी- तालुक्यातील लोणवाडी येथे सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास तुटलेल्या वीज तारांना स्पर्ध होवून बालचंद फुलचंद परदेशी यांच्या मालकीच्या दोन म्हशींचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. या घटनेत शेतकर्‍याचे सुमारे सव्वा लाखांचे नुकसान झाले. शेतकरी बालचंद फुलचंद परदेशी यांच्या शेतानजीक असलेल्या धनराज देठे यांच्या शेतामधे किरण बालचंद परदेशी याने म्हशी व काही गुरे चरण्यास सोडली होती.त् यावेळेस या शेतामधे मुख्य वीज वाहिनीचा तार तुटल्याने लागोपाठ दोन म्हशींचा स्पर्श होवून त्या जागीच गतप्राण झाल्या. किरण परदेशी यांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी लाकडी दांडक्याने या म्हशींना सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. वीज वितरण कंपनीचे उप अभियंता प्रफुल्ल कोकाटे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. शेतकर्‍याला योग्य ती मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.