वजनकाटा घेतल्याच्या कारणावरून चौघांना मारहाण

0

चिंचवड ः वजनकाटा घेतल्याच्या कारणावरून कारणावरून लाथाबुक्क्यांनी व लाकडी बांबूने एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण केली. तसेच धमकीही दिली. हा प्रकार बुधवारी (दि. 22) वेताळनगर, चिंचवडगाव येथे घडला. प्रसाद लक्ष्मण बिन्नर (वय 40, रा. वेताळनगर, चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पप्पू अडसूळ व त्याच्या मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तू माझा वजनकाटा घेतला काय?, मी तुझ्याकडे पाहतोच’ असे बोलून आरोपी यांनी संगनमत करून फिर्यादी व त्यांचा मुलगा, मुलगी तसेच पत्नी यांना लाथाबुक्क्याने व लाकडी बांबूने मारहाण केली. यात फिर्यादी बिन्नर यांच्या पाठीला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. तुझ्याकडे पाहतोच, अशी धमकीही आरोपी यांनी दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.