वरणगावचा चौफेर विकास केवळ जलसंपदा मंत्री महाजनांमुळेच शक्य

0

आमदार चंदूलाल पटेल ; वरणगावात 12 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

भुसावळ- वरणगाव नगरपरीषद स्वच्छतेच्या बाबतीत जिल्ह्यात पहिली आली असून विकासाच्या बाबतीत देखील जिल्ह्यात पहिल्याच क्रमांकावर आहे. वरणगाव शहराचा चौफेर विकास केवळ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यामुळेच झाला असल्याचे गौरवोद्गार आमदार चंदूलाल पटेल यांनी येथे काढले. वरणगाव नगरपरीषदेच्या वतीने शहरात 12 कोटींच्या विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी पटेल हे बोलत होते.

मंत्री महाजनांमुळेच वरणगावचा विकास
आमदार चंदूलाल पटेल आपल्या भाषणात म्हणाले की, शहरात 66 लाख रुपये खर्चून व्यायाम शाळा, 72 लाखांची ई लायब्ररी, वाचनालय, रस्ते, काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक, मॉडेल शौचालय यासह 12 कोटी रुपयांच्या विकासकामांचा धडाका नगरपरीषदेने लावला असून याचा आनंद आहे. हे सर्व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरी महाजन यांच्यामुळेच शक्य झाले असून त्यांनी दिलेल्या 30 कोटींच्या निधीतून शहराचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील बढे म्हणाले की, वरणगाव शहरात मंत्री महाजनांच्या मार्गदर्शनाने विकासकामे जोरात सुरू आहेत. जिल्ह्यात वरणगाव पालिका प्रथम क्रमांकावर असून चिंता करू नका, निधी भरपूर वरणगावसाठी येणार असल्याचे बढे म्हणाले. वरणगाव शहरातील भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यशस्वितेसाठी अजय पाटील, संजयकुमार जैन, प्रवीण ढवळे, शामराव धनगर, सचिन मेथळकर, हितेश चौधरी, रमेश पालवे, सुनील माळी यांच्यासह असंख्य तरुण उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील बढे, समाजसेवक प्रमोद सावकारे, नगरसेवक राजेंद्र आवटे, प्रदेश सरचिटणीस अजय भोळे, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ.बापू जंगले, जि.प.उपाध्यक्ष नंदू महाजन, नगरसेविका माला मेढे, नगरसेविका नसरीन बी.साजीद कुरेशी, मेहनाजबी इरफान पिंजारी, माजी सभापती राजेंद्र गुरचळ, कामगार नेते मिलिंद मेढे, माजी सरपंच साजीद कुरेशी, ईरफान पिंजारी उउपस्थित होते. सूत्रसंचालन अजय पाटील तर आभार संजयकुमार जैन यांनी मानले.