वरणगावात घराला आग ; लाखोंचे नुकसान

0

वरणगाव- सिध्देश्वरनगर भागातील मातंग वाड्यातील बंद घराला आग लागल्याने घरांतील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. भास्कर लालू पवार (51, रा.मातंगवाडा) हे कुटूंबासह बाहेरगावी गेले असताना मध्यरात्री इलेक्ट्रीक पोलवरून विद्युत तारेचा जास्त दाबाचा वीजपुरवठा झाल्याने घराला आग लागल्याने घरातील गव्हाचे दोन कट्टे, तांदुळाचा एक कट्टा, दहा लुगडी, पाच सुट पँट, तीन गाद्या, फायबरच्या चार खुर्च्या, तीन पाण्याच्या टाक्या, गॅस शेगडी तसेच 15 दिवसांवर मुलांचे लग्न आल्याने मजुरीचे जमा करून ठेवलेले 80 हजाराची रक्कमही आगीत जळाली. महसूल विभागाचे कर्मचारी यांनी एक लाख तीस हजार रुपये नुकसानीचा पंचनामा केला आहे. पवार परीवाराला शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.