वरणगावात छत्रपती शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा बसवणार

0

नगराध्यक्ष सुनील काळे यांची घोषणा ; नागरीकांमध्ये आनंद

भुसावळ- वरणगाव नगरपरीषदेच्या वतीने भोगावती नदी जवळील किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारू पुतळा बसवण्याचा संकल्प नगरपरीषदेचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शिवजयंतीच्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमापूजन प्रसंगी व्यक्त केला. शहर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.

लवकरच परवानगी मिळणार
अश्‍वारूढ पुतळा बसवण्याचा ठराव नगरपरीषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. या ठरावाला विशेष म्हणजे उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ सूचक तर अनुमोदक म्हणून नगरसेविका माला मिलिंद मेढे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा नगरसेवकांच्या सहकार्याने बसवण्याचा संकल्प असून त्यासाठी लागणार्‍या विविध परवानगी जमा करण्याचे काम मुख्याधिकारी बबन तडवी व बांधकाम अभियंता भय्यासाहेब पाटील व त्यांचे कर्मचारी करीत आहे तसेच शहराच्या मुख्य ठिकाणी छत्रपतींचा पुतळा हा शहराच्या सौंदर्यात भर घालणारा असल्याचे नगराध्यक्ष म्हणाले.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ, चंद्रकांत बढे, सहाय्यक निरीक्षक सारीका कोडापे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, माला मेढे, अरुणा इंगळे, प्रतिभा चौधरी, शशी कोलते, रोहिणी जावळे, वैशाली देशमुख, गणेश चौधरी, रवींद्र सोनवणे, विष्णू खोले, उत्सव समितीचे अध्यक्ष काकासाहेब देशमुख, नामदेव मोरे, सुपडू पहेलवान, रामदास माळी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.