वरणगावात देशभक्तीपर गीतांनी श्रोते झाले भावूक

0

सर्वसामान्य माणुसही सैनिक -उपनिरीक्षक निलेश वाघ ; वरणगाव शहरात ‘एक शाम शहीदो के नाम’ कार्यक्रम

वरणगाव- जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘एक शाम शहीदो के नाम’ या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले. मेणबत्ती पेटवून शहीद जवानांना स्मरण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वरणगाव शहर पत्रकार असोसिएशन दिव्यांग विकास आघाडी व भुसावळ कलाकार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
फुलगाव येथील स्वातंत्र्यसैनिक एट महार रेजिमेंटचे सेवानिवृत्त लान्स नायक पितांबर लोंढे, नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, विरोधी पक्षनेते राजेंद्र चौधरी, नगरसेवक रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी, भाजयुमोचे माजी शहराध्यक्ष प्रदीप भोळे, वरणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वंदना पाटील, शालेय समिती चेअरमन चंद्रकांत बढे, सदस्य संजय ढाके, वरणगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक निलेश वाघ, कामगार नेते मिलिंद मेढे, शिवसेनेचे विलास मुळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, वाय.आर.पाटील, काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील, माजी उपसरपंच शेख सईद शे.भिकारी, भागवत पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

देशभक्तीपर गीतांनी श्रोते भावूक
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर व मुलांच्या हस्ते मेणबत्ती पेटवून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली तर सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. भुसावळ कलाकार असोसिएशनच्यावतीने सादर करण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यातून नकळत अश्रू ओघळले. सेवानिवृत्त सैनिक पितांबर लोंढे म्हणाले की , सैनिकाचे शरीर पोलादी तर मन फुलासारखे असते तर सर्वसामान्य माणूस देखील सैनिक असल्याचे उपनिरीक्षक निलेश वाघ म्हणाले.

यांनी घेतले यशस्वीतेसाठी परीश्रम
वरणगाव शहर पत्रकार असोशिएशनचे अध्यक्ष सुरेश महाले व दिव्यांग विकास आघाडीचे अध्यक्ष विनायक शिवरामे, पत्रकार विजय वाघ, मनोहर लोणे, सुनील वानखेडे, विनोद सुरवाडे, अजय जसवाल, मुन्ना गौंड, संतोष माळी, अनिल पाटील, सुधीर पाटील, राजु खडसे आदींनी परीश्रम घेतले.