वरणगावात नगरपरीषदेतर्फे फवारणी : अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन

0

वरणगाव : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वरणगावात नगरपरीषदेतर्फे फवारणी सुरू असून नागरीकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले आहे. सोडियम हायपोक्लोराईडद्वारे वरणगाव पालिकेचे कर्मचारी गुढी पाडव्याचा सण असलातरी कामावर हजर राहून फवारणी करीत असून नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात दोन दिवसात संपूर्ण शहरात फवारणी व धुरळणी पूर्ण होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

90 टक्के कर्मचारी कामावर
सरकारने केवळ पाच टक्केच कर्मचारी कामावर येणार असल्याचे सांगितले असलेतरी वरणगाव शहरात नगरपरीषदेचे 90 टक्के कर्मचारी स्वतः च्या जीवाची परवा न करता पूर्णपणे मेहनत घेत आहे. नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य पथकाची निर्मिती सुद्धा करण्यात आली आहे. आपल्या नगरपरीषदेचे प्रामाणिक कर्मचारी, मुख्याधिकारी, सर्व अभियंता, कार्यालयीन अधीक्षक, सर्व स्टाफ व सर्व सन्मानीय नगरसेवक त्यांच्या त्यांच्या वॉर्डात थांबून नागरीकांना सहकार्य करीत आहेत. त्यांना नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्याधिकारी शामकुमार गोसावी व सन्माननीय नगरसेवकांनी केले आहे.