वरणगाव पालिका आरक्षण सोडत : आजी-माजी नगराध्यक्षांना फटका

0

वरणगाव- वरणगाव पालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली मात्र त्याचा विद्यमान नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह माजी नगराध्यक्ष अरुण इंगळे व विरोधी पक्षनेते राजेंद्र चौधरी यांना फटका बसला आहे. आता त्यांना दुसर्‍या प्रभागातून नशीब आजमावे लागणार आहे. नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवार, 18 रोजी आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले होते. भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे व वरणगाव नगरपरीषदेचे मुख्याधिकारी शाम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली.

प्रभागनिहाय आरक्षण असे- छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय, मकरंद नगर येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. सुरुवातीला महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असल्याने सोडत काढण्यात आली. त्यात अनुसूचीत जातीचे (मागासवर्गीय) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 17 व अनुसूचित जाती (मागासवर्गीय) महिला राखीव प्रभाग क्रमांक 18 असे असणार आहेत. अन्य प्रभागनिहाय आरक्षण असे- प्रभाग क्रमांक एक- सर्वसाधारण (जनरल) महिला/पुरुष, प्रभाग क्रमांक दोन- ना.म.प्र. खुला वर्ग (ओबीसी) महिला/पुरुष, प्रभाग क्रमांक तीन- सर्वसाधारण (जनरल) महिला राखीव, प्रभाग क्रमांक चार- सर्वसाधारण (जनरल) महिला राखीव, प्रभाग क्रमांक पाच- सर्वसाधारण (जनरल) महिला राखीव, प्रभाग क्रमांक सहा- सर्वसाधारण (जनरल) महिला राखीव, प्रभाग क्रमांक सात- नामप्र खुला वर्ग (ओबीसी) महिला राखीव, प्रभाग क्रमांक आठ- सर्वसाधारण (जनरल) महिला/पुरुष, प्रभाग क्रमांक नऊ- नामप्र खुला वर्ग (ओबीसी) महिला/पुरुष, प्रभाग क्रमांक 10- सर्वसाधारण (जनरल) महिला राखीव, प्रभाग क्रमांक 11. सर्वसाधारण (जनरल) महिला/पुरुष, प्रभाग क्रमांक 12- सर्वसाधारण (जनरल) महिला राखीव, प्रभाग क्रमांक 13- नामप्र खुला वर्ग (ओबीसी) महिला राखीव, प्रभाग क्रमांक 14- सर्वसाधारण (जनरल) महिला/पुरुष, प्रभाग क्रमांक 15- सर्वसाधारण (जनरल) महिला/पुरुष, प्रभाग क्रमांक 16- नामप्र खुला वर्ग (ओबीसी) महिला राखीव. असे निवडणुक करीता प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आल. आरक्षणासाठी ईश्वरचिठ्ठी काढण्यासाठी शहरातील 11 वर्षाची लहान मुलगी आर्या निलेश झांबरे हिची मदत घेण्यात आली.

राजकारणाचे गणिते बदलणार
या सोडतीमध्ये नगराध्यक्ष सुनील काळे व विरोधी पक्षनेते राजेंद्र चौधरी यांचा प्रभाग महिला राखीव तर माजी नगराध्यक्ष अरुण इंगळे यांचा प्रभाग आरक्षण निघून सर्वसाधारण खुला झाल्याने यांच्यासह 18 नगरसेवकांपैकी 16 नगरसेवकांना फटका बसलेला आहे तर शिवसेनेच्या शशी कोलते व माला मेढे यांना सोयीस्कर प्रभाग सोडत झाली आहे. नवीन प्रभागात जाऊन निवडणूक लढवताना राजकारणाची गणिते सामाजिक विषय व इतर गणितांना वेग मिळणार असून खर्‍या अर्थाने आता निवडणुकीला रंगत चढणार आहे

यांनी घेतले परीश्रम
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, प्रशासन अधिकारी पंकज सुर्यवंशी, कर निर्धारण अधिकारी आझाद पटेल, पाणीपुरवठा अधिकारी गणेश चाटे, नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ, सर्व प्रभागांचे नगरसेवक, नगरसेविका, गावकरी वर्ग उपस्थित होते. या सोडतीसाठी नगरपालिकेचे गंभीर कोळी, संजय माळी, गणेश कोळी, अनिल तायडे, राजु गायकवाड, राजु सोनार, रवी धनगर, कृष्णा माळी, प्रशांत माळी, सुधाकर मराठे, संतोष वानखेडे आदी कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले.