वराडसीमजवळ अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळला

0

भुसावळ- तालुक्यातील वराडसीम गावाजवळील वाघूर कॉलनीच्या पाटचारीपुढील नाल्याच्या पुलाजवळ
30 ते 35 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या इसमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबत कारण गुलदस्त्यात आहे. पोलीस पाटील वराडसीम खबर देणार सचिन अरविंद वायकोळे (37) यांनी दिलेल्या खबरीनुसार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मंगळवार, 10 रोजी सकाळी साडे आठ वाजेपूर्वी मृतदेह आढळल्यानंतर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मयताच्या अंगावर किडे चालत असल्याने नग्न व कुजलेल्या स्थितीतील मृतदेहामुळे या ईसमाचा खून करण्यात आला की अन्य कुठल्या कारणावरून त्याचा मृत्यू झाला ? याची माहिती कळू शकली नाही. पोलिसांकडून मयताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तपास उपनिरीक्षक सचिन खामगड, युनूस शेख करीत आहेत.