वाकडमध्ये अनधिकृत पत्राशेड, टपर्‍या हटविल्या

0

अतिक्रमण विभागाची कारवाई

पिंपरी चिंचवड ः महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वाकड येथील महापालिकेच्या हस्तांतरित जागेवरील अनधिकृत पत्राशेड, टपर्‍या हटविल्या आहेत. तसेच सीमाभींत, ओट्यावर शुक्रवारी कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 25, 26 येथील दत्तमंदिर, वाकड रस्ता येथे अतिक्रमण झाले होते. 45 मीटर रस्ता रुंदीकरणाने बाधित महापालिकेस हस्तांतरित केलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत टपर्‍या थाटल्या होत्या. अतिक्रमण विभागाने या पत्राशेड, टपर्‍यावर धडक कारवाई केली. 20588.82 चौरस फुट असलेले चार पत्राशेड, 12 ओट्टा, तीन टपरी, एक गेट, 25 बोर्ड, आठ सीमाभिंतीवर कारवाई करण्यात आली. उपअभिंता, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांच्या पथकाने कारवाई केली. तीन जेसीबी, एक ट्रक, 18 महापालिका कर्मचार्‍यांच्या सहकार्याने कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. 80 पोलीस तैनात होते.