वाकड पोलिसांच्या कामगिरीमुळे 25 लाखांचे 201 मोबाईल परत

0

आयुक्तालयात आनंदी वातावरणात कार्यक्रम
पिंपरी-चिंचवड : वाकड परिसरातून चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले 25 लाख रुपये किमतीचे 201 मोबाईल फोन वाकड पोलिसांनी मूळ मालकांना परत केले. हा मोबाईल वाटपाचा कार्यक्रम आज (गुरुवारी) पोलीस आयुक्तालयात पार पडला. वाकड पोलिसांनी गहाळ झालेल्या आणि चोरीला गेलेल्या 700 मोबाईल फोनची माहिती काढली. त्यातील 201 मोबाईल फोन महाराष्ट्रासह विविध राज्यातून हस्तगत केले. सर्व मोबाईल फोन पोलीस आयुक्तांच्या हस्ते मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी डी डी सणस, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, नितीन धोरजे, जावेद पठाण, सुरेश भोसले, रमेश गायकवाड, विक्रम जगदाळे, भैरोबा यादव, शाम बाबा, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, नितीन गेंगजे, दीपक भोसले, मधुकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली.