वातावरणात बदल; ढगाळ वातावरणामुळे उकाड्यापासून दिलासा

0

जळगाव: उन्हाच्या झळा सोसत असलेल्या जळगावकरांना आज रविवारी काही प्रमाणात दिलासा मिळाला. मान्सून पूर्व वातावरणाची निर्मिती झाल्यामुळे आज दुपारपासून वातावरणात बदल झाले. ढगाळ वातावरणामुळे पावसाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाले होते. जिल्ह्यात काही ठिकाणी किरकोळ पावसाने हजेरी देखील लावली.