वायूसेनेने केलेल्या कारवाईच्या आनंदात पिंपरीत भाजपचा जल्लोष !

0

पिंपरी-भारतीय वायूसेनेच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांनी आज (मंगळवारी)पहाटे साडे तीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर 1000 किलोचे बॉम्ब फेकले. या कारवाई निमित्त वायुसेनेचे अभिनंदन करत भाजपने जल्लोष साजरा केला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पिंपरी-चिंचवड शहर भाजपने जल्लोष केला. यावेळी महापालिकेच्या ‘अ’ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे, ‘फ’ प्रभागाच्या कमल घोलप, भाजपचे ज्येष्ठ नेते महेश कुलकर्णी, प्रवक्ते अमोल थोरात, राजेश पिल्ले, नगरसेवक माऊली थोरात, संजय मंगोडेकर, नगरसेविका शर्मिला बाबर, नगरसेवक राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, माजी महापौर आर.एस.कुमार, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, प्रभागाचे स्वीकृत सदस्य राजू सावंत, वैशाली खाड्ये, आशा काळे, मधुकर बच्चे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.