वारकऱ्यांवर काळाचा घाला; पिकअपच्या अपघातात पाच वारकरी ठार !

0

सांगोला: भरधाव पिकअपची ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात६ जण जखमी झाले आहेत. जखमीपैंकी चौघांवर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहे. सांगोला – पंढरपूर रोडवरील मांजरी गावाजवळ शब्बीर मुलाणी वस्तीसमोर हा अपघात घडला. बेळगावीमधील वारकरी पिकअपमधून गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कार्तिकी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठलच्या देवदर्शनासाठी निघाले होते.

चालक यल्लाप्पा देवाप्पा पाटील (वय 37 रा.हंगरगा ता.जि.बेळगावी), कृष्णा वामन कणबरकर (वय 42), महादेव मल्लाप्पा कणबरकर (वय 45), लक्ष्मण परशुराम आंबेवडीकर (वय 45), अरुण दत्तात्रेय मूतभेकर (वय 37) सर्वजण रा. मंडोळी ता. जि. बेळगावी असे ठार झालेल्या भाविकांची नावे आहेत. तर परशुराम गणपत दळवी वय 32 रा. मंडोळी, गणपत यल्लाप्पा दळवी वय 70, तमान्ना नारायण साळवी वय 50 , वैजिनाथ मारुती कनबरकर वय 45 सर्वजण रा.मंडोळी , गुंडू विठ्ठल तरळे वय 70 रा.मन्नूर, दिलीप मारूती शेरेकर वय 25 रा.बसीरकट्टी ता.जि.बेळगावी अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.