वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर खड्डयात कोसळले : चालकाचा मृत्यू

0

नागझिरी शिवारातील रेल्वे लाईनजवळील घटना

जळगाव– मोहाडी परिसरातील नागझिरी शिवारात रेल्वेचे पूलाचे काम सुुरु आहे. या कामाच्या ठिकाणी असलेल्या खड्डयात नाझगिरी शिवारातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पडल्याची घटना सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रॅक्टर चालक विनोद महारु मालचे वय 36 रा. मोहाडी याचा मृत्यू झाला आहे. मेहरुण मालकाचे हे ट्रॅक्टर असल्याची माहिती मिळाली आहे.

हे ट्रॅक्टर घेवून चालक विनोद मालचे हे जळगावकडे येते होते. रस्त्यातच रेल्वेलाईन शेजारी पूलाचे काम सुरु असल्याने याठिकाणी कामासाठी खड्डा करण्यात आला होता. ट्रॅक्टर घेवून जात असतांना खड्डयाचा अंदाज न आल्याने चालक मालचे यांनी अचानक ब्रेक दाबला आणि त्यांचे ट्रॅक्टर रेल्वेचे काम सुरु असलेल्या खड्डयात कोसळले. रेल्वेच्या कामगारांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच मोहाडी ग्रामस्थांना प्रकार कळविला. यानंतर मृत चालक विनोद मालचे असल्याचे निष्पन्न झाले.