वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने घेतला ३ नागरिकांचा बळी !

0

नंदुरबार: वाळू वाहतूक करणारा डंपर आणि अॅपे रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. हा अपघात तालुक्यातील कोळदा ते लहान शहादा दरम्यान झाला. या अपघातात ३ जण ठार झाल्याची माहिती समोर मिळाली आहे. अपघातातील काही जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातात इतका भीषण होता की रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.