वाहतूक नियमनाचे मोठे आव्हान : पंकज देशमुख

0

पुणे : पुणे शहरात वाहतूक नियमनाचे मोठे आव्हान आहे. ते पेलण्यासाठी जनजागृती आणि नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मत वाहतूक शाखेचे नवनियुक्त उपायुक्त पंकज देशमुख यांनी व्यक्त केले. दरम्यान, हेल्मेट सक्तीची कारवाई यापुढेही सुरूच राहाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची सातारा पोलीस अधीक्षकपदी बदली झाली. तर त्यांची जबाबदारी दोन दिवसांपूर्वीच पंकज देशमुख यांनी स्वीकारली. या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पुण्यातील वाहतूक अडचणी सोडविण्याचा मानस आहे. यासाठी सर्वसामान्य नागरिक आणि वाहतूक कर्मचार्‍यांकडून सूचना मागवण्यात येतील. या सूचनांचा विचार करून सक्षम वाहतूक व्यवस्था देण्यास प्राधान्य असेल. शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याची संख्याही भरपूर आहे. प्रत्येक नागरिकाने नियम पाळले पाहिजेत व हेल्मेट परिधान केले पाहिजेत, असे देशमुख यांनी सांगितले.